बायो डिझेल विकतांना पकडल

39

बायो डिझेल विकतांना पकडल
विकणा-या वाहणावर प्रशासनाची कारवाई

मूल
डिझेल पंपावर डिझेलची विक्री न करता मार्गाने फिरून डिझेल विक्री करणा-या वाहणा विरूध्द कारवाई करावी. अश्या आशयाच्या तक्रारीवरून मूलचे तहसिलदार डाॅ. रविंद्र होळी यांनी मार्गाने फिरून बायो डिझेल विक्री करणाÚया एका वाहणा विरूध्द नुकतीच कारवाई केली आहे. 1 मे 2019 च्या शासनाच्या पत्रान्वये बायो डिझेल गांवात फिरून विकण्यास मनाई आहे. ज्या ठिकाणी बायो डिझेलचे पंप आहे त्याच ठिकाणी बायो डिझेल विक्री करावे, असे निर्देश आहेत, असे असतांना नेक्सस कंपनीचा बायो डिझेल विक्री करणारे एक वाहण मूल शहरात मार्गावर बायो डिझेल विक्री करीत आहे. याचा शहरातील अन्य डिझेल पंपावर परिणाम होत असल्याने वाहणास हानीकारक असलेल्या बायो डिझेल विक्रीस प्रतिबंध घालावा. अशी तक्रार मूल येथील बालाजी पेटोलीयमचे संचालक यांनी केली होती. सदर तक्रारीवरून मूलचे तहसिलदार डाॅ. रविंद्र होळी यांनी नुकतीच सदर वाहणा विरूध्द कारवाई केली असून दोन दिवसाचे आंत बायो डिझेल विक्री संदर्भातील दस्तऐवज सादर करावे. असे निर्देश दिल्याने होणा-या कारवाई कडे स्थानिक डिझेल पंप चालकांचे लक्ष लागले आहे.