येरगाव ते मूल बस सुविधा विद्यार्थ्यांसाठी चालू करावी उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई यांची मागणी

65

मूल :— तालुक्यातील मौजा पिपरी दीक्षित ते मुल या बसने दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी व विद्यार्थी प्रवास करतात. सध्या नववी ते पुढील वर्गासाठी शाळा सुरू झालेली आहे. त्यामुळे पिंपरीदीक्षित व त्या परिसरातील खेड्यातील जाणे-येणे करणाऱ्या मुलांना शाळेमध्ये येण्यासाठी बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे.तरी लवकरात लवकर बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी उलगुलान संघटनेच्या वतीने एस टी डेपो मूल येथे निवेदन देण्यात आले .
वरील मागणीची तात्काळ दखल घेऊन बससेवा सुरू करावी अन्यथा उलगुलान संघटना तीव्र आंदोलन करणार असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला .निवेदन देतांना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, हर्षल भुरसे, रोहित शेंडे, साहिल खोब्रागडे , टिपूल चावरे,आदित्य नागापुरे ,प्रज्वल नागापुरे ,अभय नागापुरे, संदीप भोयर, संदीप चावरे, साक्षी नागपुरे, कांचन काठवले, समीक्षा फुलजले नवनाथ चावरे, वैष्णव नागापुरे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते