मुल येथील प्रशासकीय भवन परिसराला संविधान चौक नाव द्या. मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य पूजा डोहणे यांचीही मागणी

57

मूल प्रतिनिधी

मुल येथील प्रशासकिय भवन परिसरात सर्व शासकिय कार्यालये असून , ती सर्व कार्यालये संविधानानूसार कार्य करीत आहेत . शहराचे सौदर्याकरण करण्यात येवून , शहरातील अंतर्गत मार्गाला महापुरुषाचे तथा असामान्य व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तींचे नाव देण्यात आले आहे . याच धर्तीवर दुभाजक खंडित असलेल्या चौकालासुध्दा नाव देण्यात आलेले आहे . सर्व शासकिय कार्यालये असलेल्या प्रशासकिय भवन परिसर चौकाला नगर प्रशासनाने महर्षी पतंजली चौक असे नाव दिलेले आहे. या नावाला आमचा विरोध नाही. मात्र ते नाव त्या परिसराला यथायोग्य नसून ते नाव बदलून संविधान चौक असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी काल आम आदमी पार्टी ने केली होती, ही मागणी योग्य असून यावर आपण कार्यवाही करून या चौकाला संविधान चौक असे नामांतरन करण्यात यावे. अशी मागणी आज मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य पूजा डोहणे यांनीही मागणीला पाठिंबा देत आज मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.