तालुका कृषी विभागामार्फत भादुर्णा येथे महिला किसान दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

52

मूल :— तालुका कृषी विभागामार्फत भादुर्णा येथे महिला किसान दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच दिपीका शेंडे,तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच संतोष रेगुंडवार ,कृषी सहायक शिल्पा मंत्रीवार,मुख्यमंत्री फेलो प्रवर्तक जगदाळे,कृषी मित्र विकेश चौधरी,अर्चना श्रीकोंडवार,सुजाता सोनुले उपस्थित होते.
यावेळी महिलांना प्रगत शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रेगुंडवार यांनी,या परिसरात सिंचनाच्या मोठया सुविधा नाही. यामुळे शेती करण्यासाठी युवक पुढे येत नाही. परंतु कृषी विभागामार्फत नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोहचवत असल्याने महिला शेती करण्यासाठी सरसावल्या आहेत,असे सांगितले.