मुल येथील प्रशासकीय भवन परिसराला संविधान चौक नाव द्यावे.

34

 

आम आदमी पार्टी मूलची मागणी

मूल प्रतिनिधी

मुल येथील प्रशासकिय भवन परिसरात सर्व शासकिय कार्यालये असून , ती सर्व कार्यालये संविधानानूसार कार्य करीत आहेत . शहराचे सौदर्याकरण करण्यात येवून , शहरातील अंतर्गत मार्गाला महापुरुषाचे नाव देण्यात आले आहे . याच धर्तीवर दुभाजक खंडित असलेल्या चौकाला सुध्दा नाव देण्यात आलेले आहे . सर्व शासकिय कार्यालये असलेल्या प्रशासकिय भवन परिसर चौकाला नगर प्रशासनाने महर्षी पतंजली चौक असे नाव दिलेले आहे ते नाव बदलून संविधान चौक असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टी मूल तालुका तर्फे करण्यात आली आहे, तसे निवेदन मूल नगर परीषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदन देतांना आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे, तालुका अध्यक्ष अमित राऊत, सचिन वाकडे, सोशल मिडिया संयोजक अभि भिमनवार, निलेश म्याकलवार,पियुष रामटेके आदी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.