28 डिसेंबरला डाक अदालत

32
चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : डाक विभागामार्फत ग्राहकांना उत्तम सेवा देणे व सेवेतील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रवर अधिक्षक डाकघर चंद्रपूर यांचे कार्यालयात दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या डाक अदालतीमध्ये चंद्रपूर क्षेत्रातील डाक सेवा संबंधित मागील सहा आठवड्यात निपटारा न झालेल्या तक्रारी, तसेच पत्र व्यवहार, स्पीड पोस्ट, काउटंर सेवा, बचत बैंक आणि मनिऑडर यांचे वितरण न झालेल्या तक्रारींवर सुनवणी घेण्यात येईल.
इच्छूक तक्रारकर्त्यांनी आपले तक्रारअर्ज दोन प्रतीमध्ये प्रवर अधिक्षक, डाकघर, चंद्रपूर 442401 या पत्यावर 20 डिसेंबर 2020 पुर्वी पाठवावी. अर्जात तक्रार संबंधीत अधिकाऱ्याचे नाव , पदनाम आणि कार्यालयचे नाव तसेच दिनांकाचा उल्लेख करावा असे चंद्रपूर डाकघरचे प्रवर अधिक्षक अ.ना.सुशिर यांनी कळविले आहे.