मूल मध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

64

मूल मध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
मूल :— (प्रमोद मशाखेत्री ) शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला मुल मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सकाळी 9 वाजता उघडणारी फुटपाथ, पानठेले,चहा टपेरी,बाजारपेठ आज पूर्णपणे बंद आहे. गजबजत असलेल्या प्रशासकीय भवनासमोरील,पंचायत समिती आफीस समोरील दुकाने पुर्णपणे बंद स्थितीत तसेच गांधी चौकातही शुकशुकाट दिसून आला.
या बंदला राज्यातील सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा असल्यानं बंद प्रभावी दिसत आहे. सराफा, किराणा, कापड, खासगी बस वाहतूक,आॅटो हे सारं ठप्प आहे. मुल येथील बाजार समितीतही शुकशुकाट असून, फळ आणि भाजी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. बंद पूर्णपणे शांततेत सुरू आहे.
12 वाजतानंतर पंट्रोल पंप सुरू झाल्याने येणाया—जेणा—या नागरीकांना कोणत्याही प्रकारचे त्रास झालेला नाही. तालुक्यात कुठेही अप्रिय घटनेची माहिती नाही. दुकानसमोरील पोलीस बंदोबस्त तसेच गांधी चौकात,पोलीस बंदोबस्त जोरदार असल्याचे दिसून येत आहे.