केंद्र शासनाने शेतक-यांच्या भावनेचा आदर करीत, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे : डॉ. अशोक जिवतोडे

71

– राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा ‘भारत बंदला’ पाठींबा
– नागपुर-चंद्रपुर महामार्गावर निदर्शने व रस्ता जाम

चंद्रपुर (प्रतीनीधी) :
केंद्र शासनाने कृषि विषयक तीन कायदे पारित केलेले आहेत, त्यास विरोध म्हणून देशातील विविध संघटनांतर्फे दि. 8 डिसेंबर 2020 रोजी भारत देश बंदचे आवाहन करीत आंदोलन छेडले होते. या आंदोलनात सहभाग घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बंदला पाठींबा देवून या शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध करीत स्थानिक जनता कॉलेज चौकात आज (दि.8) ला सकाळी 11 वाजता निदर्शने केली व घोषणा दिल्या. यावेळी गर्दी जमल्याने काही वेळेसाठी रस्ता जाम झाला होता.
कृषीप्रधान देशात शेतकरी विरोधी कायदे होवू देणार नाही अशी भुमिका घेवुन राष्ट्रीय कृषी कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापले आहे, केंद्र शासनाने शेतक-यांच्या भावनेचा आदर करीत, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांनी मांडले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष नितिन कुकडे, सचिव विजय मालेकर, कार्याध्यक्ष बबन राजुरकर, डॉ. संजय बरडे, संजय सपाटे, आल्हाद बहादे, रविकांत वरारकर, मंगेश पाचभाई, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. जोत्स्ना राजुरकर, सौ. विदया शिंदे, सौ. मन्जुळा डुडुरे, राहुल ठाकूर, जितेंद्र बुचे, सचिन थिपे, प्रकाश गाठे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.