ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचगाव (डोर्ली) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मुत्यू

53

ब्रम्हपूरी (प्रतिनिधी ):—ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचगाव (डोर्ली) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मुत्यू झाला आहे. सायत्रा ठेंगरी (60) असं मृतक महिलेचं नाव असून ही महिला सरपण गोळा करायला संध्याकाळी घरामागे गेली होती. त्यावेळी बिबट्याने हल्ला करून या महिलेचा जीव घेतला.

गुरुवारी म्हणजे 3 डिसेंबर रोजी याच गावातील ताराबाई ठाकरे या 55 वर्षीय महिलेचा बिबट्याचा हल्ल्यात मुत्यू झाला होता, सकाळी गावाबाहेर शेण टाकायला गेलेल्या ताराबाईवर बिबट्याने केला होता. बिबट्याच्या हल्लानंतर गावामध्ये सध्या मोठा तणाव असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.