महिलांना रोजगाराच्या संधी विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

46
चंद्रपूर, दि. 7 डिसेंबर : महिलांकरिता विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी या विषयावर महीला आर्थीक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे हे दि. १० डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन पोर्टलब्दारे मार्गदर्शन करणार आहेत.
इच्छुक उमेदवारांना meet.google.com/rqw-ingn-tgd ऑनलाईन लिंक द्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कोरोना संसर्गजन्य महामारीमुळे उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होऊ शकत नाही. म्हणून उमेदवारांकरीता वरीलप्रमाणे ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ०७१७२-२७०९३३ या दुरध्वनीवर संपर्क करावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाच्या केंद्रप्रमुख भाग्यश्री वाघमारे यांनी कळविले आहे.