पोंभुर्णा येथे दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्ष स्थापन

50
पोंभुणा येथे दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्ष स्थापन
चंद्रपूर, दि. 7 डिसेंबर : दिव्यांग व्यक्ती व सर्व नागरिकांना दिव्यांग व्यक्ती संदर्भातील सर्व कायदे व योजनांची माहिती सहज व सुलभ मिळावी याकरीता पंचायत समिती, पोंभुर्णा येथे नुमतेच दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षाचा कामकाजाचा दिवस आठवडयातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 4 असा असून इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले असल्याचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी कळविले आहे.