कॉंग्रेस नेते संजय मारकवार यांचा अपघातात मृत्यू आज दुपारनंतर राजगड या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

55

कॉंग्रेस नेते संजय मारकवार यांचा अपघातात मृत्यू
मूल :— खेडी—गोंडपिपरी मार्गावरील भोवर्ला—गावानजीक रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात मूल पंचायत समिती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती,विद्यमान संचालक तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष,कॉंग्रेसचे नेते संजय मधुकर मारकवार (52) यांचा मृत्यू झाला.
संजय मारकवार हे दुचाकीने खेडीवरून भोवर्ला मार्गे स्वगाव राजगड कडे जात असताना भोवर्लाजवळ रस्तावरील खडयात दुचाकी गेल्याने ते दुचाकीवरून उसळून पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. लगेच त्यांना सावली येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र,गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना प्रथम मूल आणि त्यानंतर चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,भाऊ असा बराचमोठा आप्तपरिवार आहे.
चंद्रपूर जिल्हयातील कॉंग्रेसचे एक धडाडीचे नेते म्हणून यांची ओळख हेाती. मूल येथील मॉ दुर्गा मंदिर प्रतिष्ठाण तसेच विविध सामाजिक संस्थांशी ते जुळले होते. जनतेच्या प्रश्नांना घेऊन विविध आंदोलने त्यांनी केली. कॉग्रेसच्या पक्ष बांधणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज दुपारनंतर राजगड या गावी  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.