आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदी तर नम्रता आचार्य ठेमसकर यांची महिला काँग्रेस सचिव पदी नियुक्ती

45

चंद्रपूर : जिल्ह्यातील एकमेव तत्पर महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची यांची महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदी तर नम्रता आचार्य ठेमसकर यांची महिला काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. आज महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस यांनी नियुक्ती केली.
जिल्ह्यातील महिलांच्या आवाज सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आमदार प्रतिभाताई धानोरकर करीत आहेत. युवतींना माईनिग शाखेत प्रवेश मिळवून देण्याचे मोठे काम त्यांच्या पाठपुराव्यातून झाले आहे. सतत महिलांचा सोबत राहून त्यांचे प्रश्न जाणून ते प्रत्यक्षात मार्गी काढणारी आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत प्रदेश महिला काँग्रेसने त्यांना हि जबाबदारी दिली आहे, त्यासोबतच समाज माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे, महिलांचे प्रश्न लावून धरणारी महिला म्हणून नम्रता आचार्य ठेमसकर यांची ओळख आहे. त्यांचा कामाची दखल घेत त्यांची महिला काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी शुभेच्छा दिल्या आहे, या नियुक्ती मुळे जिल्ह्यातील महिला काँग्रेसला येत्या काळात बळ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस मध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. सर्वच स्तरातून शुभेच्छा च्या वर्षाव होत आहे.