आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेवून सुदृढ आरोग्य ठेवण्याचे प्रयत्न करावे, असे आव्हान आयसीटीसी मूलच्या समुपदेशक मीना नंदनवार यांनी व्यक्त केले.

55

मूल : एचआयव्ही बाधित व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे, त्यासोबतच नियमीत आरोग्य तपासणी करून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेवून सुदृढ आरोग्य ठेवण्याचे प्रयत्न करावे, असे आव्हान आयसीटीसी मूलच्या समुपदेशक मीना नंदनवार यांनी व्यक्त केले.

उपजिल्हा रूग्णालय मूल एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, संकल्प बहुउद्देशिय ग्राम विकास संस्था, द्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उसेगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर व जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयसीटीसी मूलच्या समुपदेशक मीना नंदनवार तर प्रमुख अतिथी म्हणून लिंक वर्कर सीमा निमगडे, लिंक वर्कर बाळू पेंदाम, आरोग्य सेविका मांदाडे, आशावर्कर वैशाली कुट्टे, सामाजिक कार्यकर्ता पुष्पाभोयर आदी उपस्थित होते. यावेळी जागतिक एकता, सामाजिक जबाबदारी या घोषवाक्येबद्दल उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच लिंक वर्कर प्रकल्पातंर्गत देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा याबद्दल लिंक वर्कर सीमा निमगडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. संचालन बाळू पेंदाम तर आभार चौधरी यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.