प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेचा या प्रकारे लाभ घ्या

53

मोदी सरकारने शेतकरी बांधवांसाठी पेंशन योजना ‘किसान मानधन योजना’ सुरू केली आहे. या योजनेसाठीची नोंदणी सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत नोदंणी करणाऱ्या शेतकरींना वयाच्या 60व्या वर्षा नंतर किमान 3000 रुपये पेंशन देण्यात येत आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे 21 लाख शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. हा पेंशन फंड भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे व्यवस्थापित केला जात आहे.

* नोंदणी कोण करू शकता –

शेतकरी पेंशन योजनेतंर्गत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणतेही शेतकरी नोंदणी करू शकतात. तथापि, तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्यांच्या कडे 2 हेक्टर पर्यंतच शेतीयोग्य जमीन आहे.

* हे शेतकरी समाविष्ट होऊ शकत नाही –

राष्ट्रीय पेंशन योजना, कर्मचारी राज्य विमा मंडळ योजना, कर्मचारी भविष्य निर्वाह योजना या सारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेच्या कक्षात समाविष्ट छोटे आणि सीमांत शेतकरी. ते शेतकरी ज्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेची निवड केली आहे. ते शेतकरी ज्यांनी श्रम आणि रोजगार मंत्रालया द्वारे राबविणाऱ्या पंतप्रधान लघु व्यवसायी मानधन योजनेचा पर्याय निवडलेला आहे. असे शेतकरी या योजनेत समाविष्ट होऊ शकत नाही.

* सरकार योगदान देणार –

या योजना अंतर्गत शेतकऱ्याचे किमान 20 वर्ष आणि कमाल 40 वर्ष पर्यंत दरमहा 55 ते 200 रुपये पर्यंत योगदान द्यावे लागणार, हे शेतकऱ्यांच्या वयावर अवलंबून आहे. वयाच्या 18 व्या वर्षी सामील झाल्यास दरमहा 55 रुपये योगदान असेल. जर आपण वयाच्या 30 व्या वर्षी या योजनेत सामील असाल तर दरमहा 110 रुपये योगदान असेल. त्याच प्रमाणे जर आपण वयाच्या 40 व्या वर्षी सामील असाल तर दरमहा 200 रुपये द्यावे लागणार. पंतप्रधान किसान मानधन योजनेत जितके हातभार शेतकरी लावणार तेवढेच योगदान पंतप्रधान सरकार शेतकरींच्या खात्यात देणार.

* नोंदणी कशी करावी –

या योजनेची नोंदणी करण्यासाठी आपल्याला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा सामान्य सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करावी लागेल. या साठी आपल्याला आधार कार्ड, दोन फोटो आणि बँक पासबुक, खसरा-खतौनी इत्यादींची आवश्यकता असेल. शेतकरींकडे बचत बँक खाते किंवा पंतप्रधान किसान खाते असणे आवश्यक आहे. योजनेतील अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारावे लागणार नाही.