ओबीसी महामोर्चाच्या आयोजकांवरील गुन्हे मागे घ्या मूल तालुका ओबीसी संघटन समितीची मागणी .

38

मूल :- चंद्रपूर येथे दिनांक 26/11/2020 ला संपन्न झालेल्या ओबीसी विशाल मोर्चाच्या अयोजकावरील गुन्हे शासनाने मागे घ्यावे अशी मागणी मूल तालुका ओबीसी संघटन समितीच्या वतीने दिनांक 4 डिसेंम्बर ला उपविभागीय अधिकारी मूल यांच्या मार्फतीने शासनाकडे करण्यात आली. ओबीसींच्या संवैधानिक हक्क अधिकारासाठी संविधानदिनी दिनाक 26/11/2020 ला चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समन्वय समितीच्या वतीने विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . सदर मोर्च्या मध्ये कोविड 19 चे सर्व नियमांचे अंतर्गत प्रत्येकाने मास्क घालणे अन्तर राखणे व सॅनिटायझरचा वापर करून हात नियमित स्वच्छ करणे इत्यादी नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले तसेच मोर्चा अतिशय शिस्तबद्ध रीतीने आयोजित करून शांततेने संपन्न करण्यात आला . सदर मोर्च्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री , खासदार तथा चंद्रपूर , वरोरा मतदार संघाचे आमदार तसेच जि.प.चे आजी , माजी अध्यक्षासह लोक प्रतिनिधींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता .मोर्चा आयोजकानी कोविड 19 नियमांचे उल्लंघन केले म्हणून रामनगर पो.स्टे.चे ठाणेदार हाके यांनी आयोजन समितीतील आयोजकावर मुंबई पो.ऑक्टचे कलम 135 व आपती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे वर्तमान पत्रातील व स्थानिक बातमी पत्रातील बातमी मधून ऐकले आहे . कोविड 19 महामारीचे काळात 23 मार्च 2020 पासून विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी हजारो कार्यक्रम केले . बऱ्याच कार्यक्रमात कोविड 19 नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले . तरी त्यांचेवर कोणतेही गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही , अशी आमची माहिती आहे. मात्र रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर चे ठाणेदार हाके यांनी ओबीसी विशाल मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल केला हा सर्वस्वी ओबीसीवर अन्याय आहे . करिता ओबीसी समन्वय समितीच्या ओबीसी विशाल मोर्चा आयोजकांवर रामनगर ठाण्याचे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घेन्यात यावा . यासाठी मूल तालुका ओबीसी संघटन समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने निवेदन नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर यांना देण्यात आले.
यावेळी मूल तालुका ओबीसी समन्वय समितीचे चंदू मारगोणवार ,संजय मारकवार, प्रा.विजय लोणबले, प्रभाकर भोयर, राकेश रत्नावार,चंद्रकांत आस्टनकर, युवराज चावरे ,जितेंद्र बलकी, लक्ष्मण खोब्रागडे,कैलास चलाख,संतोष शनगणवार, प्रभाकर धोटे व ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.