मूल येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग संसारोपयोगी वस्तू जळून खाक!

34

मूल :— शहरातील वार्ड नंबर 11 इंदिरानगर येथील रहिवासी अशरफ खान शरीफ खान यांच्या घरात आग लागल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याची माहिती होतात अग्निशामक दलाची वाहन येऊन आग विझविण्यात यश आले. त्यामुळे मोठी भीती टळली. घर मालक हे बाजार बाजार जाऊन चष्मे, बेल्ट अशा वस्तू विकून उदरनिर्वाह करतो. अशा परिस्थितीत अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने अश्रफ खान शरीफखान यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
यावेळी पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन यांनी घटनस्थळी येऊन पंचनामा केला. आग लागल्याची माहिती होताच मूल नगर परिषदेचे नागरसेवक प्रशांत समर्थ, आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष अमित राऊत यांनी स्वतःभेट देऊन पाहणी केली. यावेळी घराशेजारील नागरिकांनी आग विझविण्यात मोठी मदत केली.
तालुका प्रशासनाने मदत करावी अशी मागणी घर मालकाने केली आहे.