प्रशांत मगरे यांना आचार्य पदवी प्रदान

70

प्रशांत मगरे यांना आचार्य पदवी प्रदान

सिंदेवाही – सचिन वाकडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले प्रशांत नामदेवराव मगरे यांनी इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय रायपुर छत्तीसगड येथून मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र या विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा संशोधनाचा विषय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कृषी पर्यावरणीय उपक्षेत्रचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मातीत सुष्म पोषक घटकाचे आणि जड धातूच्या स्थितीचे मूल्यांकन हा होता.
मगरे हे सिंदेवाही येथील शिंदे वाई येथील रहिवासी असून त्यांचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण सिंदेवाही येथेच झालेले आहे.
या संशोधनाकरिता त्यांना मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र इंदिरा गांधी कृषि विश्वविद्यालय रायपुरचे प्रा. डॉ. के. टेडी यांचे मुख्य मार्गदर्शन लाभले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील प्रा. डॉ. आर. एन. काटकर मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग यांचे उपमुख्य मार्गदर्शन लाभले. इंदिरा गांधी कृषि विश्वविद्यालय रायपुर तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील सहयोगी प्राध्यापकांचे आचार्य पदवी संशोधनासाठी अमूल्य मार्गदर्शन लाभले.
आचार्य पदवी प्राप्त केल्यामुळे प्रशांत मगरे यांचे विद्यापीठ स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे.