लाभाथ्यामध्ये असंतोष पंतप्रधान आवास’साठी पाच ब्रास वाळू केव्हा मिळणार ?

79

लाभाथ्यामध्ये असंतोष
पंतप्रधान आवास’साठी पाच ब्रास वाळू केव्हा मिळणार ?
मूल (प्रमोद मशाखेत्री ):— पंचायत समिती अंतर्गत व नगरपालीका अंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजना गरीब व गरजु लाभाथ्र्याना व दारिद्रय रेषेखाली जीवन जगणा—यांना शासनाकडून अनेक योजना अंतर्गत घरकुलांचे वाटप करण्यात आले. परंतु रेतीला सोन्याचा भाव असल्यामुळे रेती घेणे सामान्यांना परवडत नाही.त्यामुळे अनेकांचे बांधकाम ठप्प आहे. अनेक लाभाथ्र्यानी पहिला धनादेश उचला नाही आणि बांधकामाला सुरूवात केली नाही. अनेक लाभाथ्यानी अर्धवट कामे आहेत.
ज्यांनी बांधकामाला सुरूवात केली नाही त्यांची मुदत संपल्याने धनादेश परत जाणार या भीतीने नागरीक हैरान आहेत. मूल तालुक्यात एकही रेती घाट लिलाव झाले नसल्यामुळे रेती कुठून आणावी असा प्रश्न लाभथ्र्याना पडला आहे.
प्रशासनाकडून गरीब गरजू लाभाथ्र्याना घरकुल बांधकामाकरीता पंतप्रधान आवास’साठी पाच ब्रास वाळू केव्हा मिळणार ?
असे असतानाही एकही रेती घाट लिलाव झाले नसल्यामुळे घरकुल लाभाथ्र्याना रेती मिळणे कठीण झाले आहे.तरी शासनाने याकडे त्वरीत लक्ष देऊन रेती घाट लिलाव झाले नसले तरीही ही घरकुल लाभार्थीकरीता मूल घाटातून रेती देण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी घरकुल लाभाथ्र्यानी केली आहे.
मुल तालुक्यात व शहरात घरकुल मंजुूर आहेत .मात्र शासनाच्या अल्प प्रतिसादामुळे घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही. दिवसेंदिवस वाढती मजूरी,सिमेंट,लोहा आणि यांचे साहित्याचे वाढते दर पाहता बांधकाम वेळेत पूर्ण होत नाही. सध्याला रेती घाट लिलाव होत नसल्यामुळे रेतीला सोन्याचा भाव आले आहेत. घरकुल लाभाथ्र्याना घराचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. शासनाच्या अल्प निधीमुळे बांधकाम पूर्ण होत नाहीत. अनेक घरकुल लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत.शासनाने घरकुल लाभाथ्र्यासाठी रेतीघाट लिलाव करण्याची गरज आहे.अशी मागणी होत आहे.