ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार करण्यास प्रस्ताव आमंत्रीत

40
चंद्रपूर, दि. 3 डिसेंबर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक योजनेंअतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र किंवा होलोग्राम तयार करावयाचे आहेत. या कामासाठी इच्छुक संस्था तयार असल्यास त्यांनी तसा प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयास सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.