समाजकल्याण विभागाद्वारे मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती प्रस्ताव स्विकारणे सुरू 20 डिसेंबर 2020 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत

55
चंद्रपूर, दि. 3 डिसेंबर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे सन 2020-21 या सत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सर्व अनुदानीत व विनाअनुदानीत मान्यताप्राप्त शाळांनी सदर प्रस्ताव विहित प्रपत्रात दिनांक 20 डिसेंबर 2020 पुर्वी सादर करावे. शाळेतील कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल जाधव यांनी केले आहे.