आधार कार्ड सोबत तुमचा कोणता मोबाइल नंबर लिंक? जाणून घ्या या सोप्या पद्धतीने

34

यूआयडीएआय (UIDAI)च्या डेटाबेसमध्ये आपल्या आधार कार्ड (Aadhar card)सोबत कोणता मोबाइल नंबर (Mobile number) लिंक्ड केला आहे हे जाणणं तुम्हाला आवश्यक आहे. कारण आधार कार्ड जवळपास सर्वच ठिकाणी अनिवार्य केलं आहे. मात्र, अनेकांना हे माहिती नसते की आपण आधार कार्डची नोंदणी करताना कुठला नंबर जोडलेला आहे. पण काळजी करु नका तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता की आधार कार्ड बनवताना तुम्ही कोणता मोबाइल नंबर जोडलेला आहे.

जर तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डसोबत लिंक असेल तर आधारच्या ओटीपीने तुम्ही आयकर रिटर्न्स सहज व्हेरिफाय करु शकतात. आधार आधारित केवायसीसाठी तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे. तरच केवायसीची प्रक्रिया आधार आधारित ओटीपीच्या माध्यमातून पूर्ण होईल.

आधारशी संबंधित सर्व वेगवेगळ्या सेवा ऑनलाईन मिळवण्यासाठी आपल्या आधार कार्डसोबत मोबाइल नंबर लिंक होणे आवश्यक आहे. जाणून घ्या तुम्ही कशा प्रकारे यूआयईडीएआयच्या डेटाबेसला तुमचा कोणता मोबाइल नंबर रजिस्टर्ड केला आहे ते.

  1. स्टेप १ – सर्वप्रथम www.uidai.gov.in वेबसाईटला भेट द्या.
  2. स्टेप २ – ‘माय आधार’ या टॅबमध्ये ‘व्हेरिफाय ईमे / मोबाइल नंबर’ सिलेक्ट करा.
  3. स्टेप ३ – आपल्या सिस्टमवर एक नवीन टॅब उघडेल. येथे आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी एन्टर करा जो आपल्याला व्हेरिफाय करायचा आहे.
  4. स्टेप ४ – कॅप्चा कोड एन्टर करा आणि मग ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.

जर तुम्ही इन्टर केलेला मोबाइल नंबर यूआयडीएआयच्या रेकॉर्डसोबत जुळत असल्यास स्क्रीनवर मेसेज येईल की आपला प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर आधीपासूनच त्यांच्या रेकॉर्डमध्ये व्हेरिफाइड आहे. जर असे झाले नाही तर मोबाइल नंबर यूआयडीएआयच्या रेकॉर्डसोबत जुळला नाही तर तुम्हाला मेसेज येईल की प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर रेकॉर्डसोबत मॅच होत नाहीये.

मोबाइल नंबर कसा अपडेट करावा

जर प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर यूआयडीएआयच्या रेकॉर्डसोबत जुळत नसेल तर तो अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. आधार केंद्रात तुमचा मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये फी द्यावी लागले. लक्षात ठेवा की, मोबाइल नंबर अपडेशन हे ऑनलाईन करता येणार नाही.