आगीत घर जळाले

33

आगीत घर जळाले
मूल :— तालुक्यातील बोंडाळा खुर्द येथील बापूजी सोनू मस्के यांच्या घराला रविवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने घर व घरातील साहित्य जळाले. जीवनावश्यक वस्तूचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. ​आग ही रात्रीच्या वेळी लागल्याने अग्रीशमन दलाला पाचारण करूनही ते पोहोचले नाही. बोअरवेलच्या पाण्याचा वापर करून आग विझविली.मात्र,तोपर्यंत घराचे छत,घरातील साहित्य,जीवनावश्यक वस्तु जळून खाक झाल्या. मात्र,जीवितहानी सुदैवाने टळली असून आग नेमकी कशामुळे लागली,हे कळू शकले नाही.मस्के कुटुंबाला जिल्हा प्रशासनाकडून आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी बोंडाळा येथील सरपंच जालींद्र बांगरे यांनी केली आहे.