मतदान केंद्र परिसरात कलम 144

36
मतदान केंद्र परिसरात कलम 144
चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत 1 डिसेंबर 2020 रोजी जिल्ह्यातील 50 केंद्रावर मतदान घेण्यात येत आहे. यवेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी व गैरप्रकार होऊ नये म्हणून 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2020 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील 50 मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मतदारांव्यतिरिक्त बेकायदेशीर जमाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. यानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काढले आहे. सदर आदेश मतदान प्रक्रीयेतील अधिकारी व कर्मचारी व मतदार यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमुद आहे.