ग्रामीण भागात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त!

48

मूल :— ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठय़ा अभावी जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यातील भेजगाव परिसरात चिचाळा मार्गे मूल येथून विद्युत पुरवठा होतो.या परिसरात जवळपास 20 गावे आहेत. मात्र मूल शिवाय कोठेही विद्युत केंद्र नाही.
परिसरातील गावाची नेहमीच दहा-दहा मिनिटांनी बत्ती गूल होते.परिणामी विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.त्यामुळे भेजगाव या केंद्रस्थानी असलेल्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीने 33 केव्ही विद्युत उपकेंद्र उभारावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भेजगाव परिसरात वारंवार विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. वीज वितरण कंपनीच्या धोरणामुळे नेहमीच कधी कमी अधिक दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे,कृषी पंप,निकामी ठरत आहे. तर,विद्युत प्रवाहावर चालणारी पीठगिरणी,राईस मिल,औषधी दुकान आदी व्यवसायाला मोठा फटका बसत आहे,त्यामुळे भेजगाव येथे विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी जोर धरत आहे.