स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभागी होण्याची संधी

31

मूल :— नगरपरिषदे तर्फे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत जिंगल चित्रकला,पोस्टर तयार करणे आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी 11 ते 14 आणि 15 ते 16 या वयोगटातील विद्यार्थी सहभाग घेऊ शकणार आहे.कोरोनाबाबत जनजागृती,कचरा लाख मोलाचा,पाण्याचा अपव्यय टाळणे आदी विषय ठेवण्यात आले आहे.
जिंगल स्पर्धेसाठी भाषा मराठी असून,ओळीची संख्या चार ठेवण्यात आली आहे. चित्रकला स्पर्धेसाठी कागदाचा आकार एफोर आवश्यक आहे. यात वॉटर कलर,पोस्टर कलर,वॅक्स कलर,स्केच पेनचा वापर करता येणार आहे.