झाडीपट्टी चा मंगेशकुमार हरपला – कलावंत सुरेश कन्नमवार

56

झाडीपट्टी चा मंगेशकुमार हरपला – कलावंत सुरेश कन्नमवार

कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी व धनंजय स्मृती नाट्य रंगभूमी वडसा येथील प्रसिद्ध नाट्यकलावंत मा. मंगेशकुमार टेंभुर्णे यांचे दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजी चंद्रपुर येथील शासकिय रुग्नालयात अल्पशा आजाराने निधन झाले .
मंगेशकुमार हे दोन दिवसांपूर्वी नाटक आटोपुन वडसा येथील नाट्य प्रेस मध्ये आले होते . अचानक त्यांच्या प्रकृती मध्ये बिघाड आल्याने त्यांना उपचाराकरीता चंद्रपुर येथे शासकीय रुग्नालयात भरती करण्यात आले होते मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मावळली .
. मंगेशकुमार हे गेल्या दहा वर्षापासुन झाडीपट्टी नाट्यक्षेत्रात काम करीत होते . नाटकात त्यांची खलनायकाची भुमिका रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकायची त्यामुळे ते झाडीपट्टी रंगभूमीवर प्रसिद्ध होते . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली, आई – वडील, व बराच मोठा आप्त परिवार आहे . त्याच्या निधनाने झाडीपट्टी वर शोककळा पसरली व मोठी हानी झाल्याचे प्रतिक्रिया लोककलावंत सुरेश कन्नमवार,प्रशांत चुदरी यांनी व्यक्त केली आहे