मतदानासाठी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना मुभा द्यावी

48
चंद्रपूर, दि. 29 नोव्हेंबर :- नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी खाजगी अस्थापना व शासकीय तथा निमशासकीय आस्थापना येथे कार्यरत मतदारांना कार्यालयीन वेळेत मतदान करता येईल. यासाठी संबंधित आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयीन वेळेचे स्थानिक व्यवस्थापन करून कार्यालयीन वेळेत
मतदारांना मतदानास मुभा द्यावी असे परिपत्रक उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे यांनी निर्गमित केले आहे.