पेट्रोल ८८.६१ तर डिझेलचा भाव ७७.२९ रू

97

चंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत. ही वाढ हळूहळू असल्याने नागरिकांच्या लक्षात यायला वेळ लागतो. मागील साठ दिवसात ८८.६१ रुपये प्रति लिटरपर्यंत पेट्रोलचे दर चढले आहे. यासोबत डिझेलचा भावही हळूहळू वाढत आहे. शुक्रवारी डिझेलचा भाव ७७.२९ रुपये प्रति लिटर होता.
पेट्रोल आता सर्व नागरिकांसाठी जीवनावश्यक गरज बनली आहे. वाहनांशिवाय कुठेही जाणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे पेट्रोलचे वाढलेले दर सर्वसामान्यांना आर्थिक कोंडीत टाकणारे ठरत आहे. डिझेलचे भाव वाढल्यामुळेही सर्वसामान्यांचे बजेट बिघडते. डिझेलचे भाव वाढले तर ट्रान्सपोर्र्टींगचा खर्च वाढून अनेक गोष्टींचे भाव वाढतात. त्यामुळे पेट्रोलच्या किमती वाढल्या की नागरिकांचा ओरड सुरू होते. मागील साठ दिवसात पेट्रोलचा दर ८८.६१ रुपये प्रतिलिटरपर्यंत गेला आहे. येत्या काही दिवसात पेट्रोलचा भाव शंभरी गाठेल, असेच दिसत आहे.
पेट्रोलचा भाव सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहन चालविणे कठीण जात आहे. अनेकजण तर सायकलचा वापर करीत आहेत.

का वाढते दर?
पेट्रोल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाºया पेट्रोलियम पदार्थ व कच्चा मालाच्या किंमती वाढल्या तर आपोआपच पेट्रोलचे भाव वाढतात. याशिवाय ट्रान्सपोर्र्टींगचा खर्च हेदेखील एक महत्त्वपूर्ण कारण पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्यामागे आहे. ट्रान्सपोर्र्टींगचा खर्च वाढला तर पेट्रोल, डिझेलच्याही किमती वाढतात. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावात दरदिवशी पेट्रोल, डिझेलच्या किमती बदलेल्या दिसतात.