चंद्रपूर – ओबीसी मोर्चा सफल झाल्याबद्दल मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं समाधान

67

चंद्रपूर – ओबीसी मोर्चा सफल झाल्याबद्दल मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं समाधान

चंद्रपूरच्या ओबीसी मोर्चात सत्ताधारी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार सहभागी झाले. लोकप्रतिनिधीनी पक्ष वगळून मागण्यांना पाठींबा दिला आहे. राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा सफल झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.जाहीर सभेच्या मंचावर राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीना स्थान देण्यात आलेले नाही. ऐतिहासिक दीक्षाभूमीवरुन निघालेल्या मोर्चाची सांगता चांदा क्लब मैदानाजवळ झाली. बहुसंख्येने दाखल होत या मोर्चाद्वारे ओबीसी समाजाने शक्ती दाखवून दिली. मोर्चाचा शेवट जाहीर सभेने करण्यात आला. आजची शक्ती केंद्र सरकारला इशारा देणारी असल्याचे मत सहभागी ओबीसी नेत्यांनी यावेळी व्यक्त केले.