दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना भरपाईची सूचना

36
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना भरपाईची सूचना
चंद्रपूर दि.25 नोव्हेंबर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे कार्यरत असलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना जमीन वाटप करण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी यांनी त्यांचेकडे प्रलंबित किंवा थकीत असलेल्या कर्जाच्या रकमेची भरपाई त्वरीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर, येथे करावी, असे निवेदन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.