पीक विमा योजनेचा लाभ घ्या, तालुका कृ​षी विभागाचे आवाहन अंतिम दिनांक गहू व हरभरा पिकांसाठी 15 डिसेंबर 2020 आहे. उन्हाळी भात पिकासाठी दिनांक 31 मार्च 2021 आहे.

55

पीक विमा योजनेचा लाभ घ्या, तालुका कृ​षी विभागाचे आवाहन
अंतिम दिनांक गहू व हरभरा पिकांसाठी 15 डिसेंबर 2020 आहे.
उन्हाळी भात पिकासाठी दिनांक 31 मार्च 2021 आहे.
मूल (प्रमोद मशाखेत्री) :— प्रधानमंत्री पिक विमा योजना (रब्बी)सन 2021 करिता राबविण्यास शासनाकडुन मंजुरी प्राप्त​ झालेली आहे. योजनेअंतर्गत गहू,हरभरा,व उन्हाळी भात ही अधिसुचित पिके आहेत.नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसुचित विमा क्षेत्र घटक ग्राहय धरण्यात येईल.चंद्रपूर जिल्हयाकरीता या योजनेअंतर्गत गहू,उन्हाळी,भात या पिकांसाठी तालुक्यातील सर्व महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
नैसर्गिक परिस्थितीमूळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान,पिक पेरणीपासुन काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग,वीज कोसळणे,गारपीट वादळ,चक्रीवादळ,पुर,क्षेत्र जलमय होणे,भुस्खलन,दुष्काळ,ईत्यादी बाबीमुळे उत्पादनात येणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान ईत्यादी बाबीकरीता नुकसान भरपाई देण्यात येत असते. सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतक—यांसाठी ऐच्छीक आहे.
बिगरकर्जदार शेतक—यांना योजनेमध्ये समाविष्ठ होण्याकरीता आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना (रब्बी)सन 2020—21 अंतर्गत गहू,हरभरा व उन्हाळा भात या पिकांसाठी जोखिमस्तर 70 टक्के निश्चीत करण्यात आला आहे.पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करावयाचा अंतिम दिनांक गहू व हरभरा पिकांसाठी 15 डिसेंबर 2020 आहे.
उन्हाळी भात पिकासाठी दिनांक 31 मार्च 2021 आहे. पिक विमा योजनेअंतर्गत गहू पिकाकरिता शेतक—यांनी भरावयाची विमा हप्तयाची रक्कम रूपये 468.75 प्रति हेक्टर असुन विमा संरक्षित रक्कम रूपये 31250 प्रति हेक्टर आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2020—21 चा लाभ जास्तीत जास्त शेतक—यांनी घेण्याबाबत तालुका अधिक्षक कृषि अधिकारी यांनी आवाहन केले आहे.