बेरोजगार युवकांना शेळीपालनाचे नि:शुल्क प्रशिक्षण

31
बेरोजगार युवकांना शेळीपालनाचे नि:शुल्क प्रशिक्षण
चंद्रपूर दि. 24 नोव्हेंबर: बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) चंद्रपूर येथे दि. 1 डिसेंबर 2020 ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत नि:शुल्क शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी कार्यालयामध्ये नोंदणी करावी. यासाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, रोजगार हमीच्या कामावर असल्यास त्याची प्रत, बीपीएल दाखला, चार पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रेशन कार्डची प्रत, मतदान कार्ड किंवा आधार कार्ड, इ. कागदपत्रासह बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जुन्या डीएड कॉलेज च्या बाजूला,रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली बायपास बल्लारशा रोड बाबुपेठ, चंद्रपूर येथे उपस्थित रहावे.
प्रशिक्षणार्थी हा 18 ते 45 वर्षे वयोगटातील असावा व कमीत कमी 8वा वर्ग पास असावा. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उद्योगधंद्यांसाठी कार्यक्रम दर आठवड्यात किंवा दर महिन्यात आयोजित केले जातात. सदर प्रशिक्षण निशुल्क असून प्रशिक्षणार्थ्यांकरिता राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील निशुल्क करण्यात आली आहे.
तरी ग्रामीण भागातील इच्छुक तरुणांनी या संधीचा लाभ घेवून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग चालू करावा. प्रशिक्षणासंदर्भात अधिक माहितीसाठी 8055936942 व 9403236285 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक मनोज सोनकुसरे यांनी केले आहे.