मूल तालुक्यात 345 पैकी सात शिक्षक कोरोनाबाधित

72

मूल तालुक्यात 345 पैकी सात शिक्षक कोरोनाबाधित
मूल :— शासनाच्या निर्देशान्वये तालुक्यातील माध्यमिक शाळांची घंटा सेामवारी वाजली असून तालुक्यातील सर्वच शाळामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी घेतली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा—यांनी कोरोनाकरिता आवश्यक असलेली तपासणी करावी,असे निर्देश दिल्याने तालुक्यातील एकुण 345 माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा—यापैकी 322 कर्मचा—यांनी आजपर्यंत तपासणी केली आहे.तपासणी केलेल्या
शिक्षकापैकी 7 शिक्षक कोरोनाबाधीत असल्याचे निप्पन्न झाले असून अजून पन्नासचे वर शिक्षकांचा तपासणी अहवाल अप्राप्त आहे.
मूल तालुक्यातील 2 हजार 283 जणांनी रॅपीड अॅंटीजन तर 4 हजार 731 जणांनी आरटीपीसीआर असे एकूण 7 हजार 14 जणांनी तपासणी केली आहे. सद्यस्थितीत मूल तालुक्यात 34 जण कोरोनाबाधीत असून आजपर्यंत 1 हजार 24जण कोरोना मुक्त जीवन जगत आहे.
कोरोना संसर्गाचे प्रमाण तालुक्यात इतर तालुक्यांच्या दृष्टीने अव्वल असले तरी सुधारण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. हे जरी खरे असले तरी येत्या काळात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी करून सुरक्षित जीवन जगावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर,तहसीलदार डॉ.रविंद्र होळी,प्रभारी वैद्यकिय अधीक्षक डॉ.उज्वल इंदूरकर आणि डॉ.सुमेध खोब्रागडे यांनी केले आहे.