चंद्रपूर- वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

54

चंद्रपूर- वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळ असलेल्या चिंचोली घाट येथे वर्धा नदीत बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम आणि प्रचन वानखेडे अशी बुडालेल्या मुलांची नावं असून, ही मुलं 15 ते 16 वर्ष वयोगटातील आहेत.

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी घुग्गुस येथील आमराई वॉर्ड परिसरात राहणारी 5 मुलं नदीवर आंघोळीसाठी गेली. पण नदीतील पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही.

वाळू उपशामुळे नदीपात्रात डोह तयार झाले आहेत. अशाच एका डोहात ही मुलं सापडली. त्यातील तीन मुलांना बाहेर पडणं कठीण झाल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. तर 2 जण बचावले. नदीत बुडालेल्या मुलांचा शोध सुरू आहे.