हेडफोन ठरतोय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक, ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्यांना कानदुखीचा त्रास

60

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेडफोन त्रासदायक ठरत आहे. तासनतास हेडफोन, एअरपॉड्स कानात असल्याने विद्यार्थ्यांना कानदुखीची समस्या जाणवत आहे.गेल्या काही महिन्यांपासून इएनटी डॉक्टरांकडे कानदुखीच्या समस्या असलेल्या विद्यार्थ्यांची रांग लागली आहे. कोरोनामुळे विद्यार्थी सध्या ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना तब्बल सहा ते सात कानात हेडफोन घालून संगणक, मोबाईल समोर बसावे लागत आहे.शिक्षकांचे बोलणे नीट ऐपू येण्यासाठी हेडफोनचा आवाजही मोठा असल्याने विद्यार्थ्यांच्या कानदुखीच्या समस्या वाढल्या आहेत, असे जे.जे.रूग्णालयातील ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले. दरदिवशी 5 ते 10 रुग्ण कानाच्या समस्या घेऊन येतात, असेही ते म्हणाले.नागरिकांनी हेडफोन वापराची सवय न बदलल्यास कानाचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता आहे. कानाच्या आतील मेण नैसर्गिकरित्या बॅक्टेरियांचा नाश करतो आणि संक्रमणास प्रतिबंधित करतो. कान स्वच्छ करण्यासाठी कापसाचे बोळे वापरल्यास कानातील मेणाचा थर नष्ट होतो. त्यामुळे कानातील अंतर्गत भागाला बॅक्टेरियाच्या संसर्ग होण्याचा धोका वाढतो. – डॉ. श्रीनिवास चव्हाण, ईएनटी विभागप्रमुख, जे.जे.रूग्णालय