आता नवीन PVC आधार कार्ड,घरबसल्या मागवू शकता !

57

आता नवीन PVC आधार कार्ड,घरबसल्या मागवू शकता !
मूल (प्रमोद मशाखेत्री) : सध्या प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक करण्यात आला. या व्यतिरिक्त नविन सिमकार्ड मिळविताना आणि बॅंकेत खाते उघडताना सर्वात आधी आधार क्रमांक देणे आवश्यक आहे. तसेच पत्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरले जाते.मुलांच्या प्रवेशाप्रकियेसाठी सुध्दा आधार कार्ड आवश्यक असते.
दरम्यान,युडिआयने आता आधार कार्डचे पॉलिव्हिनाइल क्लोराईड (PVC) कार्ड जारी करत आहे.
नविन आधार कार्ड अगदी एटीएम कार्ड किंवा के्डिट कार्ड सारखे आहे. जे आपण पाकीटमध्ये सहजपणे ठेवू शकतो.तुमच्या मनात असा प्रश्न उद्भभवू शकेल की पॉकेट साइजचे आधार कार्ड देखील यापुर्वी तयार गेले होते.मग यात नवीन काय आहे ?
नवीन पीव्हीसी कार्ड छापण्याची आणि लॅमिनेशनची गुणवत्ता अधिक चांगली असल्याचे युआयडीएआयने स्वत:व्टिट करून सांगितले आहे.हे कार्ड बरीच वर्ष टिकले. या व्यतिरिक्त नवीन पीव्हीसी आधार कार्ड व्दारे,कार्डची सत्यता क्युआर कोड व्दारे त्वरीत पुष्टी केली जाईल. यात कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवणार नाही.दिसायला आकर्षक आणि बरेच दिवस टिकेल. तसेच हे आधुनिक सुरक्षित फिचर्ससह आहे.सुरक्षेसाठी या नवीन कार्डमध्ये एक होलेाग्राम,पॅटर्न,घोस्टइमेज आणि मायक्रोटेक्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे पीव्हीसी कार्ड पावसात देखील खराब होणार नाही. नवीन पीव्हीसीकार्ड साठी तुम्हाला युआयडीएआयला 50 रूपये मोजावे लागतात.त्यानंतर हे कार्ड तुम्हाला घरपोच केले जाते.
तर तुम्ही घरी बसून नवीन पीव्हीसी आधार कार्ड ची आॅर्डर करू शकता. यासाठी सर्वात आधी युआयडीएआयची अधिकृत वेबसाईट https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint वर जावे लागेल. त्यानंतर https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprintमध्ये वर क्लिक करा. आॅर्डर आधार पिव्हीसी कार्डवर क्लिक करताच आपल्याला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हॅच्यूअल आयडी किंवा 28 अंकी ईआयडीक्रमांक द्यावा लागेल. यात तिन्हीपैकी एक क्रमांक द्यावा लागेल.
आधार क्रमांक दिल्यानंतर खाली दिलेला सिक्योरिटी कोंड किंवा कप्चा कोड द्या. त्यांनतर खाली
क्लिक करा त्यांनतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल ओटीपी सबमिट केल्यानंतर खाली दिलेल्या सबमिटवर क्लिक करा.
शेवटी पेमेंटचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही सर्व डिजिटल माध्यमाव्दारे 50 रूपये भरा,त्यानंतर आधार पीव्हीसी कार्डची आर्डर होईल. काही दिवसानंतर पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टव्दारे आपल्या घरी पोहचेल.