महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम पंचायत फिस्कुटी येथे शिवार फेरी करण्यात आली.

47

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत
ग्राम पंचायत फिस्कुटी येथे शिवार फेरी करण्यात आली.
मूल (प्रमोद मशाखेत्री) :— तालुक्यातील फिस्कुटी येथे आज शिवार फेरी करण्यात आली. व त्यामध्ये मजगी, बोडी खोलीकरण, फळबाग लागवड, वृक्ष लागवड, नॅडेप, गांडुळ युनिट, गुरांचा गोठा, शेळ्यांचा गोठा, कुकूटपालन शेड, पांदन रस्ता, अंगणवाडी, खडीकरण, सिमेंट कॉक्रींट रस्ता, नाली, पेवरब्लॉक, स्मशानभुमी सौदंर्यीकरण, शेततळे, तलावात मत्सतळे, धान्य साठवणुक कोठार, सिडीवर्क, भौगोलीक परिस्थितीनुसार वैयक्तीक व सार्वजनिक कामे व ग्राम पंचायतीचे उत्पन्न वाढीकरीता सुध्दा मदत होईल असे शिवार फेरी मध्ये कामे घेण्यात आली.
त्यावेळी श्री. कलोडे साहेब जिल्हा परिषद डेपटी सी ओ श्री. प्रधान साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती मूल व प्रशासकीय अधिकारी जिडगीलवार साहेब व रामटेके ग्रामसेवक फिस्कुटी तसेच शेतकरी, माजी ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच, सदस्य, मुख्याध्यापक, ग्राम रोजगार सेवक व इत्तर कर्मचारी उपस्थित होते.