ऋतीक शेंडे हत्या प्रकरणात तिघांना अटक तीन दिवसाची पोलीस कोठडी
मूल :येथील विहीरगांव परिसरातील रहिवासी रितीक अनिल शेंडे याची २७ डिसेंबर रोजी रात्री १०.१५ वाजताचे सुमारास पंचायत समिती समोर निर्घुण हत्या करण्यात आली. ऋतीक शेंडे याचा खून झाल्याची माहिती होताच पोलीस स्टेशन आणि उपजिल्हा रुग्णालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आरोपींच्या मोठे
अटकेचे आव्हानपोलीसांसमोर होते.
त्यानुसार वरीष्ठ पोलीस अधिका-यांच्यामार्गदर्शनात चंद्रपूर आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकासोबतचं पोलीसांचे वेगवेगळे पथक तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरवत शनिवारला चंद्रपूर येथील स्थानीय गुन्हे शाखा पथकाने मूल येथील वार्ड नं. १५ मधील युवक राहुल सत्तम पासवान ( २० ) आणि अजय दिलीप गोटेफोडे (२१) यांच्या चंद्रपूर येथे मुसक्या आवळल्या. आरोपीच्या जबानीनुसार भुषण राजु चचाणे (२१) रा. वार्ड नं. १४ मूल याचा शोध सुरू असताना ब्रम्हपुरी येथे त्याने आज आत्मसर्पण केले.
मूल शहरात घडलेल्या ऋतीक अनिल शेंडे याच्या निर्घृण हत्या प्रकरणात तीन आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले आहे. सदर प्रकरणात पुन्हा काही आरोपी असावे या संशयाने पुढील तपास केल्या जात आहे. ताब्यात असलेल्या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.