तालुका स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा आणि राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे उद्घघाटन

14

मुल:- क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित तालुका क्रीडा समितीच्या वतीने मुल तालुका स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२४-२०२५ आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सन्मा. मृदुला मोरे मॅडम उपस्थित होत्या, विशेष अतिथी क्रीडा मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते सन्मा.प्रभाकर भोयर तर अतिथी तालुका क्रीडा अधिकारी सन्मा.विनोद ठिकरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्वप्रथम ओलंपिक पदक विजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव आणि हाकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात येऊन मान्यवर मंडळींनी शालेय क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मार्गदर्शन केले यावेळी मुल तालुक्यातील ,नवभारत विद्यालय मुल, देवनिल विद्यालय टेकाडी, नवभारत कन्या विद्यालय मुल, माऊंट कान्व्हेंट मुल, इंदिरा गांधी विद्यालय जुनासुर्ला, डॉ.आंबेडकर विद्यालय गडीसुर्ला , बालविकास प्राथमिक शाळा मुल, सुभाष प्राथमिक शाळा मुल, नवभारत विद्यालय राजोली, विश्वशांती विद्यालय मारोडा आदी शाळेतील स्पर्धेक सहभागी झाले होते. कबड्डी स्पर्धा व्यवस्थित पार पडल्या या कार्यक्रमांचे संचालन तालुका क्रीडा संयोजक नामदेव पिजदुरकर यांनी केले तर कार्यक्रमांचे आभार शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दिनेश जिड्डीवार यानी मानले स्पर्धा यशस्वी होण्याकरिता सर्वांचे सहकार्य लाभले.