मूल शहरात गांधी चौकात तान्हा पोळ्याची धूम, लाकडी नंदी बैलांची विक्री जोरात

22

विविध सांस्कृतिक परंपरेने नटलेल्या मूल येथे पोळा या सणाला एक वेगळेच महत्त्व आहे.अतिशय वेगळ्या पद्धतीने पोळ्याचा सण साजरा केला जातो.
मात्र,पोळ्याच्या पाडव्याला मूल शहरात तान्हा पोळा 2024 साजरा करण्याची परंपरा आहे. लाकडापासून तयार केलेले नंदी बैलांची मिरवणूक काढली जाते, ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून आजही सुरू आहे. महत्वाचे म्हणजे लाकडी नंदी बैलांची विक्री करून, आज कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. यावर्षी नंदी बैल विक्रीसाठी सज्ज झाले असून, ३०० रुपये ते 10 हजार रुपये किमतीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून बैलांकडे बघितले जाते. ऊन आणि पावसात शेतीत राबणाऱ्या बैलांच्या प्रति सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मूल शहरात तान्हा पोळा सणाची विशेष धूम असते. तान्हा पोळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
लहान मुलांमध्ये सुद्धा बैलांच्या प्रति प्रेम निर्माण व्हावे, या उद्देशाने तान्हा पोळा साजरा करण्यास सुरुवात झाली होती.
लाकडी नंदी बैलांची विक्री जोरात पोळ्याच्या पाडव्याला साजरा होणाऱ्या तान्हा पोळ्यासाठी लाकडी नंदी बैलांचे बाजार सजायला सुरुवात झाली आहे. सर्वात लहान नंदी बैलाची किंमत ३०० रुपये असून, सध्या सर्वात मोठा नंदी हा 10,000 रुपयात विक्रीसाठी तयार आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी नंदी तयार केले जातात त्याठिकाणी नंदी बैल विकत घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.
पोळ्याच्या सणाला बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. यामध्ये लहान मुलांचा सहभाग असावा या उद्देशाने,तान्हा पोळा सण साजरा केला जाऊ लागला.