22 ते 24 ऑगस्ट दरम्यान नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी (भरती) प्रक्रिया- जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू

55
22 ते 24 ऑगस्ट दरम्यान नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी (भरती) प्रक्रिया
चंद्रपूर, दि.21 : चंद्रपूर जिल्हा होमगार्ड अंतर्गत पुरुष व महिला उमेदवारांची नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी निवड प्रक्रिया (भरती) 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान सकाळी 4 वाजतापासून पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या अध्यक्षतेखली आयोजीत करण्यांत आली आहे.
होमगार्डचा पदावधी कालावधी हा 3 वर्षाचा असून ही नोकरी नाही. 22 ते 24 ऑगस्ट रोजी सकाळी 4 ते 10- वाजेपर्यंत नोंदणीकरीता येणाऱ्या उमेदवारांचाच होमगार्ड निवड प्रक्रियेकरीता विचार केला जाईल. सकाळी 10 वाजता नंतर नोंदणीकरीता येणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेकरीता प्रवेश दिला जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
रहिवासी भागातील पथक/ उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार कागदपत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरतील. तसेच इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. नोंदणीबाबत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/loginl.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. 22 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 6197 पर्यंत महिला उमेदवार, 23 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 2964 पर्यंत पुरुष उमेदवार 24 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 2966 ते 6200 पर्यंत पुरुष उमेदवार घेण्यात येणार आहे. नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीचे निकष खालील प्रमाणे असतील.
आवश्यक कागदपत्रे : 1) शाळा सोडल्याचा दाखला मुळप्रत (बोनाफाईड ग्राहय धरले जाणार नाही.) 2) रहिवासी दाखला 3) तहसीलदार यांचे कडील राशन कार्ड 4) आधार कार्ड 5) 2 पासपोर्ट साईज फोटो.
उमेदवार वैद्यकीयदृष्टया पात्र असावा. पोलीस चारित्र्य अहवाल अनुकुल असावा. उमेदवार हे वेतनी सेवेत कार्यरत असतील तर कार्यालयाचे अथवा मालकांचे संमती ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. संबंधित उमेदवारांस विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी देणे अनिवार्य आहे. उमेदवारांस नोंदणीचे वेळी तसेच उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यांत येईल. तसेच खेळ, आय.टी.आय., जडवाहन चालक ड्रायव्हिंग लाइसन्स, एन.सी.सी. प्रमाणपत्र इ. असल्यास सोबत आणावे. नोंदणीचे वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. उमेदवारांना नोंदणी करीता स्व:खर्चाने यावे लागेल, असे जिल्हा समादेशक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.