मूल तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा

35

मूल :— तालुक्यामध्ये गुरूवार (दि. 15) भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन मुल तालुक्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. तसेच, उपविभागीय अधिकारी,तहसिल,पंचायत समिती कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालया ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

   मूल येथील तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसिलदार मुदुला मोरे,नायब तहसिलदार कुमरे,नायब तहसिलदार पंडीले,नायब तहसिलदार नैताम,नायब तहसिलदार, पवार पुरवठा अधिकारी , यांसह तहसील कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी, संजय गांधी निराधार योजना,पुरवठा विभागातील कर्मचारी,महसूल विभागाील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

पंचायत समिती मूल च्या प्रांगणात संवर्ग विकास अधिकारी राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस ठाणे, वन विभाग, तालुक्यातील शाळा, ग्रामपंचायत, महाविद्यालयामध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. काही ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन तसेच वेगवेगळ्या उपक्रमातून भारताचा हा राष्ट्रीय सण जल्लोषात साजरा करण्यात आला.

कृषी महाविद्यालय मूल येथे प्राचार्य डॉ विष्णुकांत टेकाळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शूरवी महिला महाविद्यालय मुल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या हर्षा खरासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच प्रा. विक्की बोंदगुलवार यांनी (मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्य सैनीक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन) अशी शपथ दिली. 

याशिवाय वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये व शासकीय, निमशासकीय कार्यालये या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. विविध सामाजिक संघटनांनी यानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणी डिजेच्या तालावर वातावरण भारून टाकत खाऊवाटप केले.

नगरप्रशासनाच्या वतीने कन्नमवार सभागृह मूल येथे देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि दिवस गीत गायनाने भारुन टाकला यानिमित्ताने आजी माजी सैनिकांच्या सत्कार  सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते, भारतीय स्वातंत्र्याचा हा उत्सव एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात  प्रशासनाला यश मिळाले .

भारत देशाचा स्वातंत्र्य दिन मूल तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार मृदुला मोरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राठोड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यशवंत पवार , या कार्यक्रमाला मूल शहरातील सर्व विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी , सामाजिक  व राजकीय नेतेमंडळी ,आजी माजी सैनिक आणि वि​विध पक्षातील मान्यवर,प्रतिष्ठीत ,जेष्ठ नागरीक,महिला तसेच,पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.  यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग घेऊन तिरंगा झेंड्याला सलामी देऊन देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.