मुंबई :लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 35 महिला पात्र ठरल्या असून 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसै महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. डीबीटी प्रणालीद्वारे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करता येते. यासाठी तुमचा आधारकार्ड क्रमांक वापरून तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. यासाठी तुमचे बँक डिटेल्स तपासले जाणार नाहीत. त्यामुळे तुमच्या ज्या बँकेला आधारकार्ड लिंक आहे, त्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्डशी लिंक असलेले बँक अकाऊंट कसे तपासायचे. हे पाहूयात.
आधारशी लिंक असलेले बँक अकाऊंट असे तपासा
सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
यानंतर तुमचा 12 अंकी आधारकार्ड क्रमांक टाकून लॉग इन करा.
आधार क्रमांक भरल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
आलेला ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये भरल्यानंतर तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसलीत.
नवीन पेजवरील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा
यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते सक्रीय आहे की नाही, हे सुद्ध समजेल.तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.
आता जर तुम्हाला वरील प्रोसेसवरून तुमचं बँक अकाऊंट कळालं असेल तर त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रूपये जमा झाले आहे. जर अजूनही जमा झाले नसतील तर तुमचा अर्ज अजूनही अप्रुव्ह झाला नाही आहे किंवा त्याची छाननी सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे.
त्यापूर्वी महिलांच्या बँक खात्या संदर्भात सरकारने महत्त्वपूर्ण आदेश दिलेत. या आदेशाचे पालन न केल्यास महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी शासनाने सांगितलेल्या अपडेटवर त्वरित दुरूस्ती करून घेणं आवश्यक आहेत.
या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डेबिटद्वारे पैसे जमा केले जातील. पात्र लाभार्थ्यांपैकी 27 लाख महिला लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्यांशी लिंक केलेले नाही. या महिलांची बँक खाती आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
यावेळी त्यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात यावी. तसेच येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्यांशी आधार कार्ड लिंक करण्यात यावे, असे आदेश दिलेत.
बँकेशी आधार लिंक करा
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय आणि बँक खाती आधार कार्डशी लिंक केली आहेत, त्यांना 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचा हप्ता जमा होणार आहेत. ज्या महिलांची बँक खाती आधार कार्डशी लिंक केलेली नाहीत, त्यांच्या खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यानंतर पैसे जमा होतील. त्यामुळे लाभार्थी महिलांनी बँकेशी आधार लिंक करावे. लाभापासून वंचित राहू नका, असे आवाहनही तटकरे यांनी केले आहे.
सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पात्र महिलांना दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये मिळत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल 80 लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांरीत केला आहे.
दरम्यान, या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत. पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही. याची काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊ या…
पहिले कारण
राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. रक्षांबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ, असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे. त्याची प्रत्यक्ष सुरुवात 14 ऑगस्ट रोजीपासून चालू झालेली आहे. आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत. त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. 17 ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी.
दुसरे कारण
बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण हे बँक सिडिंग स्टेटस आहे.बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
तिसरे कारण
तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. पण तुमच्या अर्जासमोर पेंडिग, Review, Disapproved, असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आहे. त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही 17 तारखेपर्यंत वाट पाहायला हवी. 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात.