शेतकऱ्यांचा मुलगा बनला डॉक्टर, पदवीदान समारोह मध्ये डॉ.वैभव साधना वैशिष्ट वाकडे यांना डॉक्टर ही पदवी देण्यात आली. जिमलगटा गडचिरोली मध्ये वैद्यकिय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येऊ शकते हे शब्द मूल तालुक्यातील चक दुगाळा एका छोट्याशा गावात राहणाऱ्या मुलाने सत्यात उतरवले आहेत.
हा एक शेतकऱ्याचा मूलगा असून त्यांच्या या यशाने त्यांचे कुटुंब आनंद झाले आहे. शेतकरी म्हटलं की घरच्या परिस्थितीचा थोडा का होईना सुगावा लागतोच.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीत राहाता मूल तालुक्यातील चक दुगाळा या गावात राहणार या युवकाने जिद्दीच्या जोरावर आणि अतिशय कष्टातुन घेतलेल्या शिक्षणातुन त्यांने नुकतेच डॉक्टर या आरोग्य विभागात वैद्यकिय अधिकारी पदावर आपले नाव कोरले आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलगा डॉ.वैभव वैशिष्ट वाकडे याने आपली ओळख महाराष्ट्राला करुन दिलीय ती म्हणजे डॉक्टर डॉ.वैभव वैशिष्ट वाकडे म्हणुन. चला तर जाणून घेऊ या डॉ.वैभव वैशिष्ट वाकडे याने कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतले , कोणत्या अडचणींवर मात केली…
जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेली डॉ.वैभव साधना वैशिष्ट वाकडे गावात राहते. दोन खोल्यांच्या घरांत वडील वैशिष्ट वाकडे आई साधना वाकडे व बहीण असे त्यांचे छोटेसे कुटुंब राहते. वैभव चे वडील शेतकरी आणि जोड धंदा म्हणून बरेच दिवस डॉक्टर म्हणून ग्रामीण भागात व्यवसाय करीत असत. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. घरची परिस्थिती बेताची असल्याने वैभव याने जिद्दआणि चिकाटीने अभ्यास करत उदिष्टाचा पिछा करत ते उदिष्ट सत्यात उतरवले आहे. त्याने हे यश संपादन केल्यानंतर आई वडीलांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले.
मुलाच्या या यशाबद्दल शेतकरी बापाचे उर सुपा ऐवढे झाले आहेत. मुलाने हे यश मिळविल्याने आनंद होत आहे. त्याच्या यशामुळे समाजात आमची मान उंचावली आहे असे वडीलांनी म्हटले आहे. नातेवाईकांचे खुप फोन येत आहेत. आज सर्व जण सत्कार करताय. त्यामुळे खुप भारी वाटत आहे आमच्या घरात असे कधी झालेच नाही. सगळीकडे कौतुक होत असल्याने आनंद झाला आहे.
वैभव याने जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने अतिशय खडतर मेहनत करीत पुढील शिक्षण घेतले. अभ्यासात तो अतिशय हुशार असल्याने त्याने अभ्यास म्हणजे अभ्यासच केला. डेअरिंग करुन यश मिळवले. मुलाने खरोखरच आमचे नाव मोठे केले असल्याचे वैभव वाकडे यांची आई साधना वाकडे यांनी म्हटले आहे. मुलाच्या यशाबद्दल बोलत आई वडीलांना गहिवरुन आले होते. तिच्या आई वडिलांनी पिएमडीजीटल न्यूज संपादक शी याबाबत संवाद साधला होता.