मैत्री, जिव्हाळा जपण्याचे पर्व !

17

 चंद्रपूर : भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. मित्रांच्या मार्फत शांततेला प्रोत्साहन आंतरराष्ट्रीय नागरी संस्था वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेडने आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचा प्रस्ताव मांडला होता. ‘फ्रेंडशिप डे’ मित्रांना आणि देण्यासाठी मैत्रीच्या भावनेला समर्पित आहे. शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या उद्योजकांकडून या दिवसाचा विशेष प्रचार झाला आणि प्रसार माध्यमांमुळे या दिवसाचे महत्त्व जगभरातील लोकांनी स्वीकारले. सन १९५८ पासून पेरूग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र – मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात, फ्रेन्डशिप बॅन्ड अर्थात रंगीत धागे बांधतात, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात आणि आपली मैत्री चिरंतन राहो, अशा सदिच्छा व्यक्त करतात. फ्रेंडशिप डे हा वर्षाचा सर्वाधिक प्रतीक्षित उत्सव आणि दिवस आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यावर्षी ४ ऑगस्टला ‘फ्रेंडशिप डे’ आला आहे. हॉलमार्क या शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या व्यवसायाचा जनक जॉयस हॉल याने २ ऑगस्ट या दिवशी लोकांना मैत्री व्यक्त करण्याची संधी देणारा दिवस सुरू केला. याला समाजातून प्रारंभी विरोध झाला, कारण यामागील उद्योजकता वाढविण्याचा हेतू समाजात स्वीकारला गेला नाही. मात्र १९९८ नंतर या दिवसाला विशेष मान्यता मिळत गेली. या दिवशी एकमेकांना बांधण्यासाठी बनवलेले रंगीबेरंगी हस्तबंध आता भारत, नेपाळ, बांगलादेश आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मिळतात. आयुष्याच्या अनेक कठीण प्रसंगात मित्र हा खंबीरपणे आपल्या मागे उभा राहातो. चुकल्यावर ओरडायला व चिडल्यावर हक्क दाखवणारा मित्र हा आयुष्यात प्रत्येकाला हवा असतो. खरी मैत्री माणसाला नेहमीच योग्य मार्ग दाखवते. कुटुंबानंतर मित्र हे माणसाचे दुसरे प्राधान्य असते. माणूस प्रत्येक चांगला-वाईट क्षण मित्रासोबत घालवतो. एखाद्या व्यक्तीने जीवनात घेतलेल्या सवयी हे मैत्रीचे परिणाम असू शकतात. माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो एकटा राहू शकत नाही आणि जगण्यासाठी त्याला मित्रांची गरज आहे. एखाद्या व्यक्तीने आपले मित्र नेहमी काळजीपूर्वक निवडले पाहिजेत. खऱ्या मित्राची कोणत्याही कारणास्तव टिंगल करू नये किंवा हरवू नये. याउलट, जे मित्र तुमचा गैरफायदा घेतात त्यांच्यापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे.