अतिवृष्टीने क्षतीग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे निर्देश @मूल तालुका : तहसीलदार मृदुला मोरे यांचे आदेश

78

मूल : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील विविध गांतील हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले होते. पीडित शेतकऱ्यांना नूकसानभरपाई मिळण्यासाठी ई पंचनामा करण्याचे निर्देश मूलचे तहसीलदार मृदुला मोरे यांनी दिले हेाते.

तालुक्यातील विविध भागांत मागील 21 ते 27 जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. अतीवृष्टीने तालुक्यातील विविध गांतील नदी, नाले व ओढ्यांसह शेतशीवारात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा झाले होते. तर काही भागात नाल्याला आलेले पुराचे पाणी शेतशिवरातील लागवड झालेल्या ख्ररीप पिकांत शिरल्याने हजारो हेक्टर रीप पिके पाण्याखाली बुडाली होती. लग ४-५ दिवसांपासून शेतात गवडीखालील पिके पाण्यात डाल्याने पंचनामे करून शासनाकडून नूकसानभरपाईची मागणी केली होती.

पाच दिवसांहून अधिक अवधीपर्यंत चौरास भागातील हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके पाण्याखाली बुडालेली आहेत. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणाची मागणी होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे अपरिमीत नुकसान झाले असून यंदा धानाची फसल हातची जाणार असेच नत परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
चौरास भागात सर्वाधिक नुकसान मूल तालुक्यात सर्वाधिक ७६८ मिमी पावसाची नोंद झाली, तर
पडलेला पाऊस (778.7मिमी, २६ जुलैपर्यंत)
मूल तालुक्यातील चौरास भागात मोठ्या प्रमाणात कृषी वीज पंप सिंचन सुविधेअंतर्गत विविध पिकांची लागवड केली जाते, पुराचे पाणी हजारो हेक्टर क्षेत्रात लागवड केलेल्या खरीप पिकांत शिरले.

दागावचा मामा तलाव फुटला
मूल तालुक्यातील दाबगाव येथील मामा तलाव फुटल्याने ८० एकर शेतात रेती पसरली. शेतात २० फुटांचे खड्डे पडले. ५० शेतकऱ्यांना नुकसानीची झळ बसली. इंग्रज काळातील या तलाव परिसरात ८० एकर शेती येते. काहींनी रोवणी केली, तर काही तयारीत आहेत. तलावाची पाळ फुटल्याने मोठे नुकसान झाले. शेतात खड्डे व रेतीचा ढीग जमा झाला. शासनाने पंचनामे करून भरण्याची देण्याची मागणी दाबगावचे शेतकरी महादेव थेरकर यांनी केली. मूल तालुक्यात एक हजार ७५८ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले. अतृिष्टीने ३३२ घरे व ३५ गोठ्यांची पडझड झाली. १ हजार ४१५ घरांत पाणी घुसल्याने नुकसान झाले. १ हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले. यामध्ये २ हजार ८९३ शेतकरी पात्र आहेत. पंचनामे सुरूच आहे, अशी माहिती तहसीलदार मृदुला मोरे यांनी दिली.