मूल तालुक्यातील घटना @एक जण जागीच ठार एक जण गंभीर जखमी

42

 मूल जवळील उमानदीच्या वळणावर बोलोरो पिकअप वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे घटना शुक्रवारी रात्री 9.30 वाजता दरम्यान घडली. सावली येथील नातेवाहीकांना भेटुन वरोरा येथे जात असताना निलेश गेडाम वय 35 वर्षे रा. वरोरा हा जागीच ठार झाला तर संदिप अशोक पासलबंशी वय 27 वर्षे रा. वरोरा असे गंभीर जखमी युवकाचे नांव आहे.
वरोरा येथील निलेश गेडाम व संदिप पासलबंशी हे एम एच 34 ए वाय 7931 या दुचाकीने सावली येथील
नातेवाहीकांना भेटण्यासाठी शुक्रवारी आले होते, रात्रौ वरोरा येथे जाण्यासाठी निघाले असता मूल व
गडचिरोलीकडे जाणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने निलेश गेडाम हा जागीच ठार झाला, तर संदिप पासलबंशी हा युवक गंभीर जखमी झाला आहे. बोलोरो पिकअप वाहन चालकाने सदर वाहने घटनास्थळावरून घेवुन पसार झाला. सदर घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवुन जखमींना मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मूल पोलीस स्टेशन येथे बोलोरो वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनुप मेश्राम हे करीत आहे.