मूल शहरातील जुन्या वस्तीत नालीसफाईच्या कामाला अखेर प्रारंभ

35

आता पावसाळा तोंडावर आल्याने शहरी भागातील नाल्यांमध्ये साचलेल्या केरकचऱ्यामुळे नाल्यात पावसाचे पाणी तुंबून राहते. त्यामुळे मुल शहरातील नगरपरीषद मूल कार्यालयाच्या वतीने तुंबलेल्या गटारी व नाल्यांमधून अंतर्गत साचलेला गाळ व केरकचरा काढून नालेसफाई स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
नाल्यातील उपसलेल्या गाळाची विल्हेवाट लावली जात आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्या उपसण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शहरात सर्वत्र नाल्यांची साफसफाई केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाल्यातील पाण्याचा प्रवाह अड्डून शहर वासीयांना त्रास होऊ नये. उंच-सखल भागात पावसाचे पाणी साचून राहू नये, यासाठी मान्सूनपूर्व सफाईबाबत चौकशी करून नालेसफाईच्या कामाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. प्लास्टिक बॉटल, पिशव्या व केरकचरा नाल्यात टाकू नये, नाल्यावर ठेवलेले साहित्य बाजूला उचलून ठेवावे, असे आवाहन न.प.मूल कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
नालीत केरकचरा टाकू नये
आता पावसाळ्याची सुरुवात लवकरच होऊन नाल्या वाहू लागतील. परिणामी, नाल्यातील कचयामुळे पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होईल. त्यावर उपाययोजना म्हणून नालेसफाईची कामे युद्धस्तरावर सुरु आहेत. असे असताना नागरिकांनी मात्र नालीत कचरा टाकू नये असे आवाहन न.प.मूल कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.