चक मानकापुर येथे पशुचिकीत्सा,लसीकरण व पशुंना बिल्ले लावणे शिबीर

30

पस सावली मार्फतीने पशुवैद्यकीय दवाखाना बोथली अंतर्गत चक मानकापुर येथे स.6-15 वाजेपासून पशुचिकीत्सा,लसीकरण व पशुंना बिल्ले लावुन आनलाईन करणे शिबीर ग्रामपंचायतच्या सहकार्याने घेण्यात येऊन 298 पशुंना पशुसेवा देऊन 137 पशुंना बिल्ले लावून आनलाईन करण्यात आले.
शिबीर ग्रामपंचायत सरपंच्या सौ.रेवताबाई कवडु मडावी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले.प्रमुुख उपस्थिती ग्रा.प.सदस्य युवराज वेट्टे, श्रीकृष्ण गेडाम, कवडुजी मडावी,प्र.पशुधन विकास अधिकारी डॉ.बंडू आकनुरवार,प्र.पविअ सुवर्णा नखाते, वनरक्षक एस.ए.नागोसे, प्रवीण मडावी यांची होती.यावेळी डॉ.बंडू आकनुरवार यांनी पशुसंवर्धनाच्या,वैरण बियाणे,पशुखाद्य योजनाची माहीती देऊन पशुंना बिल्ले लावुन आनलाईन घेण्याबाबत माहीतीदिली.शिबीरामध्ये औषधोपचार,285 घटसर्प लसीकरण, गर्भ वंधत्व तपासणी,खच्चीकरण करण्यात येऊन 137 पशुंना बिल्ले लावून आनलाईन करण्यात आले.
शिबीर यशस्वीतेसाठी जिल्ह्य पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.उमेश हीरुडकर,संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक यांचे मार्गदर्शनाखाली प्र.पशुधन विकास अधिकारी डॉ.बंडू आकनुरवार,व्रणोपचारक अजय ढेंगळी, परिचर स्वप्निल कुनघाडकर, वनरक्षक एस.ए.नागोसे यांनी परिश्रम घेतले.